प्रतिनिधी.. दिलीप अवगण पाटील
मंगरुळपिर तालुक्यातील श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा नागी येथील सुरू असणाऱ्या यात्रा महोत्सवा निमित्त 1 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सर्व तज्ञ डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली शिबिरा मध्ये एकूण 250 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सोबतच रुग्णांची मोफत शुगर व बीपी तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना मोफत औषद वाटप करण्यात आली.
नेत्र तपासणीचा अनेक गोरगरीब गरजू रुग्णांनी उपचार घेतला शिबिरामध्ये डॉ. अश्विनी गव्हाणे ( नेत्र रोग तज्ञ ) डॉ.पुरुषोत्तम नरवाडे सर , डॉ . अनिकेत येवले सर, डॉ. साजिद खान सर , डॉ.व्हाव्हारे सर , रुग्णसेवा युवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके व सदस्य हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्तिथी म्हणून लाभलेले महादेव संस्थान चे अध्यक्ष पंढरीनाथ राऊत , सरपंच मोहन वानखडे, उपसरपंच सुरेंद्र राऊत , पोलीस पाटील सतीश वानखडे तर शिबिराच्या आयोजनासाठी व शिबिर यशस्वी करण्यासाठी , माजी सैनिक अमर राऊत ,पंकज इंगोले,मयूर राऊत,जय वानखडे ,बबन वानखडे , रामेश्वर राऊत , लक्षमन राऊत, सचिन राऊत , गणेश वानखडे , संकेत वानखडे , आनंद राऊत, अजय धोटे, ओम वानखडे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते
