अमित बगाडे
पुणे -: हमारा विश्व फाउंडेशन तसेच बारामती लाईव्ह क्राईम संपादक अनिता अग्रवाल ह्या पूर्ण महाराष्ट्रभर तसेच पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड या ठिकाणी महिलांवर ती अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी स्वतः जाऊन तसेच त्यांच्या टीमच्या माध्यमातून वेळोवेळी न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच त्यांचे कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना अन्नदान मदतीचा हात त्या नेहमी देत असतात तसेच त्यांचे प्राण्यांवर पण खूप प्रेम असल्यामुळे आधार पशुपक्षी फाउंडेशन च्या माध्यमातून पशुपक्षी यांचे देखील ते पालन करत आहेत तसेच सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर आहेत त्यांना आवड आहे महाराष्ट्रामध्ये महिला संघटन त्यांचे मोठे असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी प्रधान राष्ट्रीय महासचिव महिला नूतन सिंह यांच्या शिफारशीने राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री मा श्री.पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते अनिता अग्रवाल यांना महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदी निवड करून दिल्ली या ठिकाणी पत्र देऊन महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली. तसेच पद स्वीकारताना अनिता अग्रवाल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री मा श्री.पशुपती कुमार पारस तसेच राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी प्रधान राष्ट्रीय महासचिव महिला नूतन सिंह यांच्या आभार मानत महाराष्ट्रात जास्तीत जास्त पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेल व महिला संघटन वाढवेल असा शब्द दिला. तसेच हमारा विश्व फाउंडेशन व बारामती लाईव्ह च्या वतीने पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

