दौं
ड:-आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मुकादमवाडी येथे हनुमान जन्मोत्सव व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दि.०६ एप्रिल रोजी सकाळी ५ वा हनुमान जन्मोत्सव तसेच १० ते १२ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दुपारी १ ते ५ पर्यंत महाप्रसादाचा आयोजन केले होते व सायंकाळी ६ ते १० या वेळेमध्ये बजरंग बली चे पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक भाविक भक्त या मिरवणुकीत ढोल ताशा हलगी च्या नादात बजरंग बली च्या घोषणा देत तल्लीन झाले होते यावेळी अनेक भाविक भक्त या छबिन्यामध्ये सहभागी झाले होते तसेच शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी सायंकाळी नाद घुंगराचा ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे मुकादमवाडी ग्रामस्थांनी आयोजन केले होते.
