इनामदार पत्रकाराच्या संघर्षमय यांच्या जीवनावर आधारित अहम चित्रपटाचे दर्शन काही तांत्रिक अडचणीमुळे 12 मे ऐवजी 9 जून ला प्रदर्शन होणार आहे




 निवासी संपादक अफसर शेख



इमानदार पत्रकाराचे संघर्ष मय जीवनावर आधारित “अहम” हा चित्रपट १२ मे ऐवजी ९ जूनला प्रदर्शित होणारा असल्याची माहिती निर्माता योगेश घोलप यांनी यावेळी दिली. नुकताच काही दिवसांपूर्वी अकलूज येथे “अहम” चित्रपटाचा टिझर प्रदर्शित सोहळा पार पडला. “अहम” मराठी चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांत मोठी उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु चाहत्यांनी असेच प्रेम व चित्रपट पाहण्याची उत्सुकता पाहता हा चित्रपट 12 मे ऐवजी ९ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.



अहम हा चित्रपट एका पत्रकाराच्या संघर्षमय जीवनावर आधारित प्रदर्शित होत असल्याचे जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नुकतीच आम चित्रपटाच्या टीमला भेट देऊन चर्चा केली आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले होते मात्र वडार समाजाच्या आक्षेपामुळे हा 12 मे ला प्रदर्शित होणारा चित्रपट 9 प्रदर्शित होणार आहे त्यामुळे चिञपट रसिकांनी सहकार्य करावे .


“अहम” चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल समाज माध्यमात वडार समाजाने त्यांच्या बोली भाषेतील संभाषणावर आक्षेप घेतला आहे का ? असा सवाल केल्यानंतर याबाबत निर्माता घोलप यांनी कसल्याही प्रकारची भावना चित्रपटातून आम्ही दुखावली नसल्याचे स्पष्ट केले. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने केवळ २८ दिवस हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. मराठी चित्रपटावर प्रेम करणाऱ्या रसिका त्यांनी संयम ठेवावे व ९ जूनला चित्रपट पाहण्यास आवर्जून यावे असे आवाहन उम्मीद फिल्म प्राॕडशन निर्माते योगेश घोलप यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post