सुविधांअभावी जनावरे व व्यापारी ४१ अंश सेल्सिअस तापमानात राहतात उभे
रिसोड प्रतिनिधी -शेख अन्सार
रि सोड : शहरात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. सध्या तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. अशा स्थितीत कडाक्याच्या उन्हात मोकळ्या आकाशाखाली जनावरांचा बाजार भरत आहे. त्यामुळे जनावरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. पाण्याची सोय नसल्यामुळे बाजारात जनावरांसह पशुपालकांचे हाल होत आहेत.रिसोड तालुक्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार दर गुरुवारी रिसोड शहरात भरतो. बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने पशुधन खरेदीसाठी व्यापारी, शेतकरी, नागरिक लांबून येतात. पण मोकळ्या जागेत भरलेल्या बाजारात सावलीची सोय नाही, तिथे जी झाडे आहेत, तीही छोटी आहेत. पावसापासून उन्हाळ्यापर्यंत जनावरांना हवामानाचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात प्राणी दिवसभर उघड्यावर राहतात. जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, जनावरांना वाहनात ढकलण्यासाठी धक्के, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, रस्ते मजबुतीकरण करावे, पाँडल लावावे, रात्री विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकंडून केली जात आहे.
