रिसोड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम



रिसोड प्रतिनिधी-अन्सार शेख

रिसोड : शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्त्याची रुंदी कमी करणाऱ्यांवर नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ता खुला करण्यात आला.या मोहिमेला 17 मे पासून सुरुवात करण्यात आली, याअंतर्गत रिसोड शहरातील वाशिम नाका परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली.  आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या अतिक्रमण मोहिमेत वाशिम नाका परिसर व्यतिरिक्त बसस्थानक व पोस्ट ऑफिस परिसरातील अतिक्रमणे



 हटविण्यात आली.  मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या देखरेखीखाली नगरपालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनी या मोहिमेत सहभाग घेतला.  त्यात प्रतापराव देशमुख, अब्दुल अजीज, प्रफुल्ल काळे, विजय नायक, रोशनी सुर्वे, राकेश जाधव यांनी हे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली.  गेल्या अनेक वर्षांपासून या अतिक्रमणाबाबत विविध प्रकारच्या तक्रारी करण्यात येत होत्या, त्यादृष्टीने ही मोहीम राबविण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post