विनामूल्य शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे उपचारासाठी मोफतरुग्णबस रवाना.

 


.कारंजा लाड महादेव तायडे

 दिनांक 15. 3. 2023 रोजी स्व. आशा देवी चव्हाण बहुउद्देशीय संस्था पहूर द्वारा डॉक्टर महेश चव्हाण मित्र मंडळ कारंजा मानोरा यांच्यावतीने मुलजीजेठा हायस्कूल स्टेट बँक समोर कारंजा येथे झालेल्या निशुल्क महाआरोग्य सेवा शिबिर मध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी भरती होण्यास सांगितले होते त्यांना आज दिनांक 20.5.2023 रोजी शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले ही चौथी बस असून त्या रुग्णांना तात्काळ सावंगी मेघे येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले यावेळी डॉक्टर महेश चव्हाण मित्र मंडळातर्फे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी डॉक्टर महेश चव्हाण  मित्र मंडळाचे प्रतिनिधी डॉक्टर गुणवंत राठोड रवी भाऊ मुळतकर. माधव जाधव टेलर अनुभव चव्हाण.वैभव चव्हाण. रविभाऊ राऊत  यांच्या उपस्थिती मध्ये बस रवाना करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post