उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा निर्घृण खून

 


शाखाप्रमुखाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीला ऊत


प्रतिनिधी नितीन बोराडे


उल्हासनगर दि २७ (प्रतिनिधी)- उल्हासनगर कॅम्प ५ येथील शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची धारधार चाकूने सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.


शब्बीर शेखच्या मटका जुगाराचा व्यवसाय करायचा. हा धंदा करताना राजकीय वरदहस्त हवा हा विचार करून त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता तसेच त्याला शाखाप्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी शब्बीर काही सहकाऱ्यांनीपरिसरातील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे कळते आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. याच रागातून घटनेच्या दिवशी शब्बीर शेख घराबाहेर उभा असताना अचानक आलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, शब्बीरचा जागीच मृत्यू झाला. रक्तच्या थारोळ्यात पडलेल्या शब्बीरला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पण


या हत्याकांडाने उल्हासनगरात खळबळ उडालीआहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी उल्हासनगर गुन्हे शाखा आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post