खेर्डा बु॥ महसूलमंडळातील शेतक -यांना अजूनही अतीवृष्टी अनुदान मिळाले नसल्याने जील्हाधीकारी यांना काजळेश्वरचे सरपंचानी दिले निवेदन .

 


कारंजा प्रतिनीधी / अशोकराव उपाध्ये .

खरीप हंगामात सोयाबीन सोंगणीचे वेळी२०२१-२२व२०२२-२३या लागोपाठ दोन वर्षात झालेल्या अतिवृष्टिने शेतकरी देशोधडी लागला . कारंजा तहसीलदार यांच्या पथकाने  पंचनामे पहाणी करून खेर्डा बू॥ महसूलमंडळ अतीवृष्टी बाधीत घोषीत केले मात्र अजून छदामही शेतकऱ्यांना मिळाला नाही .जील्हाधीकारी एस . शनमूरवराजन यांनी शुक्रवारी उमा प्रकल्प परीसराला भेट दिली तेव्हा काजळेश्वरचे सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांनी जीलाधीकारी यांना निवेदन देत शेतकऱ्यांना  दोनही वर्षाचे सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खाती वळती करावे अशी मागणी निवेदन देऊन केली आहे .

या सोबतच उमा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण व्हावे ; उजळेश्वर ;पलाना ;पारवा ;उकर्डा ;

पानगव्हान ;विराहीत ;धानोरा ;खांदला शेतशिवाराचे पांदन रस्ते मातोश्री पांदन रस्ते योजनेतून पूर्ण करावे ;काजळेश्वर ते उजळेश्वर नदी नाल्यावर पूल बांधकाम तसेच नाला खोलीकरण कामे सुरु व्हावीत करीता निवेदनाद्वारे मागणी केली आहे . यावेळी जिल्हाधिकारी यांचे सोबत उपविभागीय अधिकारी ललीत कुमार वऱ्हाडे ;तहसिलदार कुणाल झाल्टे यांची उपस्थीती होती . नीवेदन देतेवेळी सरपंच नितीन पा . उपाध्ये यांचे सोबत उपसरपंच तैसीमभाई ;ग्रा.पं. माजी सदस्य सुभाष पा उपाध्ये ;जम्मूभाई ;कल्लूभाई ;

मुजक्कीर भाई ;हर्षल उपाध्ये ;विनोद उपाध्ये ;गजानन भड यांचे सह समाजकल्याण सभापती अशोकराव डोंगरदीवे यांची उपस्थिती होती .

Post a Comment

Previous Post Next Post