रिसोड प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : नातीनसह नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या एका आजीला नातीन ला पाण्यात बुडत असतांना आपला जीव गमवावा लागला.ही घटना ३० मे रोजी सकाळी दहा वाजता रिसोड तालुक्यातील देगाव गावात घडली.देगाव येथील रहिवासी शांताबाई प्रल्हाद कावरखे वय 50 वर्ष हे आज दहिसर निमित्त देगाव जवळून जाणाऱ्या पैनगंगा नदीत आंघोळीसाठी आपल्या 3 नातीसह गेल्या होत्या.त्यांची नात पाण्यात शिरली तेव्हा तिला खोलीचा अंदाज आला नाही.आल्यामुळे ती बुडत होती शांताबाईंनी ते पाहताच पाण्यात उतरून नातीनला वाचवले. मात्र ती पाण्याच्या खोलात जात राहिली आणि काही वेळातच ती पाण्यात बुडाली. नातीन हे सर्व दृश्य पाहत राहिली आणि आरडाओरड करून गावकऱ्यांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी शांताबाईला पाण्यातून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
