कारंजा प्रतिनिधी / अशोकराव उपाध्ये
सामाजिक ऋण फेडायचे असेल तर हातात हात घालून कार्य करा त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देता येतो त्याला सक्षम बनविणे हेच काम खरे ईश्वरीय कामआहे त्यातच पुण्य मिळतेअल्लाहचेआदर्श दुत होता येते त्यामुळे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करा अल्लाहआपल्याला बरकत देईलअसे उदगार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कारंजा मानोरा मतदार संघाचे नेते हाजी मो.युसुफ पुंजानी यांनी शहरातील मेमन युथ विंग कारंजा तर्फे ईद मिलन सोहळा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले . कारंजा मेमन जमात खाना येथे दि. १४ मे ला संपन्न झाला.या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी हाजी मो.युसुफ पुंजाणी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हाजीआरीफ भाई भोगाणी, हाजी फारुक भाई पोपटे,हाजीअ.करीम सेठ ममदाणी,हाजी गफार सेठअंसारी, हाजी युसुफ सेठ मामदाणी,हाजी शफीसेठ घाणीवाला,हाजी शफी सेठ पुंजाणी,हाजी इम्तियाज मालाणी, जावेदआकबानी मंचकावर उपस्थितीत होते.प्रास्ताविकअनिस अंसारी यांनी केले मेमन युथ विगचे कारंजाअध्यक्ष इमरान पारेख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की समाजात आपल्या पेक्षा मोठ्यांचेआदर केल्यानेआयुष्यात यश प्राप्त होते यापुढेही आपल्या पेक्षा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन वेग वेगळे सामाजिक कार्य सुरू ठेऊ . लवकरच मेमन युथ विंग तर्फे एम्बुलेंस काही दिवसांत आपल्या सेवेत येणारअसल्याचे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेमन युथ विंगचे कार्यकर्तानी प्रयत्न केलेत . कार्यक्रमातअलताफ पुंजाणी,पत्रकार प्रा.सी.पी.शेकुवाले,पत्रकार हमीद शेख पत्रकार आरिफ पोपटे, पत्रकार फीरोज शेकुवाले,पत्रकार सैय्यदआसिफ,पत्रकार मोहम्मद मुनिवाले,पत्रकार एम.डी.मुन्नीवाले यांच्या सह शहरातील मेमन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
