फुलचंद भगत
वाशिम :-पोलीस दलात चालक पोलीस शिपाई पदासाठीच्या १४ जागांसाठीच्या भरती प्रक्रियेस दि.०२ जानेवारी, २०२३ पासून सुरुवात झाली होती. मैदानी चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये गुणानुक्रमे उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दि.२६.०३.२०२३ रोजी पार पडली होती.
सदर चालक पोलीस शिपाई भरती – २०२१ ची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर सर्व निवड झालेल्या उमेदवारांची मैदानी-कौशल्य-लेखी चाचणीतील उपस्थितीची खात्री करून नेमणुकीस पात्र असलेल्या १० पुरुष व ०३ महिला अश्या एकूण १३ उमेदवारांना दि.१९.०५.२०२३ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस अंमलदारांना लवकरच प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. नव्याने हजर झालेल्या चालक पोलीस शिपाई अंमलदारांना मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी नियुक्तीपत्र देत मार्गदर्शन केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
