राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत तांड्याच्या पोरीने पटकाविले दोन सुवर्णपदक




तांडा सुधार समितीने केला सत्कार


प्रतिनिधी दिलीप अवगण 

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा तांडा  ता.मालेगांव येथील मूळ रहिवाशी असून व सध्या कारंजा येथे वास्तव्यास असलेल्या प्रा. दिलीप चव्हाण यांची मुलगी कू. प्रणया दिलीप चव्हाण हिने पंजाब राज्यातील चंदीगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकावित आपल्या महाविद्यालयाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नावलौकीक केले. कारंजा येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या प्रा. दिलीप चव्हाण यांची प्रणया कन्या असून ती महात्मा गांधी जूनीयर लोहगाव कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी हॅडबॉल स्पर्धेतसुद्धा राज्य स्तरावर तिने मेडल पटकाविली होती . तिच्या या असाधारण यशाची दखल घेत तिचे कौतुक करून तिला प्रोत्साहन देण्यासाठी  अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.सरदार राठोड यांनी तिच्या घरी भेट देत पुष्पगुच्छ व ‌शॉल देऊन तिचे सत्कार केले. तिच्या यशस्वी वाटचालीसाठी  अखिल भारतीय तांडा सुधार समिती सदैव तिच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. तांड्याच्या समग्र विकासाची हि नांदी ठरेल प्रा. दिलीप चव्हाण हे मुळात खेळाडू वृत्तीचे असल्याने आज प्रणयाने हे यश संपादन केल्याचे मत तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी व्यक्त केली तसेच कारंजा नगरीचे माझी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी  सत्कार केला असून  चव्हाण यांच्या मित्र परिवार कडून अभिनंदना चे वर्षाव सुरू आहे

Post a Comment

Previous Post Next Post