भर जहागीर ते मोरगव्हाण दरम्यान रस्त्यावरील वाळलेल्या वृक्षाची भिती
रिसोड : तालुक्यातील भर जहागीर ते लोणार राज्यमार्गावर मोरगव्हाण नजिक रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून वाळलेला आंबा आहे.हल्ली या वाळलेल्या झाडाच्या काही फांद्या रस्त्यावर पडत आसल्याने रहदारी करणा-या साठी आपघाताला निमंत्रण मिळत आहे.या गंभीर प्रकाराकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसत आसल्याचे बोलल्या जात आहे.
रिसोड ते छत्रपती संभाजी नगर,पुणे,नाशीक,मुंबई सारख्या शहरा कडे दररोज शेकडो वाहणांची रहदारी राहाते.जालना शहराकडे मोठ्या संख्येने वाहणांची मोठ्या प्रमाणात सततची वर्दळ आहे.या रस्त्या दरम्यान मोरगव्हाण नजीक आंब्याचे वाळलेले विशाल वृक्ष आहे.हा वाळलेला वृक्ष रस्त्या लगत आसल्याने सर्वच वाहणांची रहदारी याच झाडा खालुन जा-ये करते.सदर वाळलेल्या वृक्षाला अनेक वर्ष झाल्याने लहाण मोठ्या झाडांच्या फांद्या,साली रस्त्यावर पडत आहेत.त्यामुळे रहदारी करणा-या वाहणांवर पडुन आपघात होण्याची भिती वाढत आहे.हल्ली सोसाट्या वारा वाहत आसल्याने अनेकदा रहदारी करना-या वाहणांना सदर वाळलेल्या आंब्याच्या भितीने जिव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे.या वाळलेल्या आंब्याची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
