प्रकाशदादांच्या प्रेमापोटी मतदारांनी कृषी बाजार समीतीच्या निवडणूकीत एकहाती सत्ता दिली .



सईताई प्रकाशराव डहाके यांचे प्रतीपादन



कारंजा प्रतीनीधी / अशोकराव उपाध्ये


कारंजा कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत स्व . प्रकाश 

दादांनी त्यांच्या कट्टरवादी सहकाऱ्यांच्या जोरावर तसेच गावागावात असलेल्या निष्ठावान मतदारांच्या भरीव सहकार्याने एकहाती सत्ता मिळाली करीता मतदार अभीनंदनास पात्र आहेत असे प्रतीपादन सईताई डहाके यांनी स्व. प्रकाशदादा डहाके यांचे द्वितीय पूण्यस्मरण कार्यक्रमात बोलतांना कृषक भवन कारंजा येथे केले .


            लोकनेते मा .आमदार स्व . प्रकाशदादा डहाके यांचे स्मृती प्रीत्यर्थ झेनीत हॉस्पीटल अमरावतीचे हृदयरोग तज्ञ डॉ . निरज राधाणी यांनी कारंजा येथे ह्दयरोग निदान शिबीर आयोजीत केले होते . तसेच ज्या मतदारांनी भरघोस मतांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता निर्वीवाद जींकून दिली त्यांच्यासाठी आभार प्रदर्शन कार्यक्रम व सर्व निर्वाचीत १८ही संचालकांचा सत्कार त्यांच्या स्मृतीदिनी आयोजीत केला होता . या कार्यक्रमात कारंजा मानोरा मतदारसंघातील आजी माजी पदाधीकारी ; कार्यकर्ते ;सरपंच ;सदस्य गण ;सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सदस्य गण मतदार ;दादांचे कार्यकर्ते मित्रमंडळी मोठया संख्येने कार्यक्रमालाउपस्थीत होते .व्यासपीठावर हाजी मो . युसूफ शेठ पुंजानी ;समाजकल्याण सभापती अशोकराव डोंगरदिवे ;जय किसन राठोड ;अशोकराव मुंदे ;जीप . सदस्य आशीष दहातोंडे ;पं.स. चे सभापती छोटूबाप्पू देशमूख ;खवि .संघाचे अध्यक्ष देवेन्द्र ताथोड बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पा . कानकीरड;भाऊराव मते ;

निळूभाऊ गजभीये ; सईताई प्रकाश राव डहाके ;न.प. चे माजी अध्यक्ष 

दत्तराज डहाके ;गोलू भाऊ डहाके ;काजळेश्वरचे लोकप्रीय युवा सरपंच नितीन पा . उपाध्ये ;पं.स. सदस्य रंगराव धूर्वे ;बाबाराव पा .ठाकरे ;अॅड अरुण खंडागळे ;प्रभाकरराव ठाकरे प्रा .लूंगे;अनंत सुपनर ;श्रीकांत लव्हाळे सह सर्व निर्वाचीत  संचालक मंडळ तसेच मान्यवर उपस्थित होते .निर्वाचीत सर्व संचालकांचा सत्कार आयोजन समितीतफै करण्यात आला . याप्रसंगी

प्रकाश दादांच्यावर मतदारसंघातील जनतेचे प्रेम या निवडणूकीत सर्वाना भरघोस मतांनी निवडून दिल्याने निर्वी वाद दिसून आले असेच प्रेम आशीर्वाद असू द्यावे असे प्रतीपादन सई ताई डहाके यांनी या प्रसंगी केले .उपस्थीत मान्यवरांनीही स्व . दादांच्या आठवणीना  याप्रसंगी उजाळा दिला .

हाजी मो .युसूफ शेठ पुंजानी ;जयकीसन राठोड यांनी या नंतरच्या निवडणूकीसाठी आम्ही डहाके परिवारासोबत भक्कमपणे सर्व जन उभे राहू असा संकल्पआपल्या भाषणातून व्यक्त केला . याप्रसंगी दत्तराज डहाके ;देव व्रत उर्फ गोलू भाऊ डहाके यांनी मतदारांचे आभार मानले . रोगनिदान शिबीरात १८३रुग्नांची तपासणी करण्यात आली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व .दादांच्या मित्रमंडळानी परीश्रम घेतले . कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन कौस्तूभ डहाके यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post