कार व लक्झरी चा अपघातात तिघेजण जखमी



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड : कार व लक्झरीच्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना 29 मे च्या रात्री नऊच्या सुमारास रिसोड लोणार मार्गावर मांगवाडी फाट्या जवळ एका वळणावर घडली यामध्ये कारचा चुराडा झाला असून तिचा जणाना हात पाय फ्रेक्चर होउन दुखापत झाली असल्याचे कळते. अद्याप जखमी बाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. खुराणा ट्रॅव्हल्स ची लक्झरी उमरखेड वरून पुण्याकडे जात असल्याचे चालकाकडून माहिती मिळाली तर सदर मारुती सुझुकी ही कार एक लग्न समारंभ आटोपून हिंगोली कडे जात असल्याचे कळते. कार ही लक्झरीला विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने धडकली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते

Post a Comment

Previous Post Next Post