पिंपरी दुमाला येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 


प्रतिनिधी- अर्जुन शेळके


पिंपरी दुमाला ता.शिरुर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग सन 2023-2024  चा देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मान निर्मलग्राम ग्रामपंचायत पिंपरी दुमाला वतीने सरपंच श्री महेंद्र डोळस व उपसरपंच सौ.जयश्री संदिप सोनवणे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान शिक्षिका श्रीमती शोभा उत्तम डोळस यांना आदरपूर्वक देण्यात आला त्यामध्ये सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प व शासकीय मानधन चेक असे स्वरूप होते यावेळी सरपंच श्री महेंद्र डोळस,उपसरपंच सौ.जयश्री संदिप सोनवणे,ग्रा.प.सदस्य मा.उपसरपंच माणिक म्हाळस्कर,मा.अध्यक्ष तंटामुक्ती संदिप सोनवणे,ग्रामसेवक विशाल ढसाळ,सोसायटी व्हा.चेअरमन नंदाबाई डोळस, विश्वनाथ चिखले,अदित्य चिखले,जयवंत शेटे,बबलु सोनवणे,रवी चिखले,अंगणवाडी शिक्षीका शेटे मॅडम,शिपाई कौशल्या चिखले व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post