अल्पवयीन मुलीला नेपाळहून पुण्यात पळून आणलेल्या मुलीची सामाजिक सुरक्षा विभागाचा पोलिसांनी केली सुटका

 


प्रतिनिधी -जयेश अहिरे

पुणे,दि.२७ :- नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा आमिष दाखवून नेपाळमधील एका तरुणीला एका तरुणाने पळवून आनुन पुण्यात आणले. तरुणीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

त्या तरुणीच्या भावाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तो नेपाळहून पुण्यात आला व एका सामाजिक संस्थेच्या मदतीने व पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अल्पवयीन तरुणीची तरुणाच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी तरुणाच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी मोहम्मद रफीक शेख (वय २३, सध्या रा. येरवडा, मूळ रा. नेपाळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख मूळचा नेपाळचा आहे. त्याने नेपाळमधील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून. तरुणीला फूस लावली.व आरोपी शेख बिगारी काम करतो. त्याने तिला पुण्यात पळून आणले. येरवडा भागातील एका खोलीत त्याने तिला डांबून ठेवले.होते शेखने तिला बाहेर जाण्यास तसेच शेजाऱ्यांशी बोलण्यास मज्जाव केला होता. शेखने तरुणीवर अत्याचार केले. शेख कामावर गेल्यानंतर तिला खोलीत कोंडून ठेवत होता. शेखच्या त्रासाला कंटाळून युवती तिने शेखच्या नकळत त्याच्या मोबाइलवरुन नेपाळमधील भावाशी संपर्क साधला. याबाबतची माहिती तिने भावाला दिली.त्यानंतर युवतीचा भाऊ पुण्यात आला. त्याने पुण्यातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती दिली.व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  युवतीचा शोध घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळगावे, अश्विनी पाटील यांनी युवतीचा शोध घेण्यास सुरूवात केले. 

तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार युवती येरवड्यातील गोल्फ क्लब भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. दाट वस्तीच्या परिसरात युवतीचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली होती. नेपाळमधील तिच्या भावाने पोलिसांना ती राहत असलेल्या भागाचे वर्णन दिले होते. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांना पाहताच तिने भावाला खुणावले. पोलिसांनी तिची खोलीतून सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी युवतीला तिच्या भावाच्या ताब्यात दिले.  पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयु्क्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post