पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणारा उमेदवार चतुःशृंगी पोलिसांच्या जाळ्यात

 


पुणे प्रतिनिधी -जयेश अहिरे

पुणे, दि. 28:- पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन सादर करुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे.


सचिन भिमराव वाघमोडे (रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण, पाषाण पुणे, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा


प्रकार ग्रामीणशिपाई भरती होण्यासाठी सचिन वाघमोडे याने आरक्षित जागेवर अर्ज केला होता. त्यासाठी त्याने बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई-प्रमाणपत्र सादर केले होते. पोलिसांनी त्याची संबंधित संस्थेकडे पडताळणी केली असता ते प्रमाणपत्र खोटे व बोगस असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांकडून फिर्याद देण्यात आली आहे. पुढील तपास पो.उप निरी. सचिन गाडेकर, करत आहे

Post a Comment

Previous Post Next Post