शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचे मा.आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या हस्ते वितरण करण्यात आले

 



 अहमदनगर प्रतिनिधी -अफसर शेख


चोंडी:-आज दिनांक 17 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह चोंडी येथे *माननीय आमदार प्रा राम शिंदे साहेब* यांच्या उपस्थितीत कर्जत जामखेड तालुक्याची खरीप हंगाम पूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते तेरा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचे वितरण करण्यात आले. तसेच सामूहिक शेत तलावातील शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी कृषी विभागाने छोटे खाणी प्रदर्शन मांडले होते यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सेल्फी पॉईंट तृणधान्याचे महत्त्व विशद करणारे फ्लेक्स. तूर शेंडा खुडणी मशीन, हूमनी किडीच्या बंदोबस्तासाठी प्रकाश सापळा, बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक याचा समावेश होता. माननीय आमदार महोदय यांनी या सर्व प्रात्यक्षिकांची जवळून पाहणी केली व माहिती ही जाणून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post