ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची वाशिम जिल्हा कार्यकारणी गठीत

 


मालेगाव / सुरज अवचार:-

        ओबीसी अधिकारी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन अंतर्गत ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ वाशिम जिल्हा कार्यकारीनिचे संघटन राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांच्या अध्यक्षतेखाली व केशव गि-हे प्रभारी जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात त्यामध्ये जिल्हाअध्यक्ष म्हणून संभाजी साळसुंदर, महासचिव-गजानन उगले . कार्याध्यक्ष-शत्रुघ्न गवळी. जिल्हा संघटक-भागवत मोहिरे,संपर्कप्रमुख-नवनाथ मुसळे,उपाध्यक्ष-श्रीकांत बोरचाटे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल बळी मालेगाव, जिल्हा महिला प्रतिनिधी संगीता काकडे आदींची नियुक्तीपत्र देऊन वाशिम जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.



           याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवनिर्वाचीत जिल्हा कार्यकारिणीचा प्रमुख मार्गदर्शक राम वाडीभस्मे,केशव गि-हे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक राम वाडीभस्मे यांनी संघटनेचा परिचय देताना संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून 2018 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून संघटन उभे केल्या गेले. भारत देशात ओबीसी आरक्षणाची निर्मिती तसेच इतिहास, त्याबाबत झालेल्या शिफारशी, आरक्षणाचे धोरण,मंडल आयोगाने केलेल्या शिफारसी, संघटना निर्मितीचे ध्येय व उद्देश तसेच संघटन कार्यपद्धती इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून प्रमुख अतिथी केशव गि-हे यांनी ओबीसी शिष्यवृत्ती, ब्रिटिश काळात 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना झाली त्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालेली नाही त्या अनुषंगाने मंडळ आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. नॉन क्रिमिलियर अट रद्द केली जावी. इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले असून  प्रस्तुत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील शेळके यांचे आभार मानले असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रस्तुत संघटनेचे जाळे पसरत असताना वाशिम जिल्ह्याचे गठन स्थानिक विश्रामगृह सह्याद्री शूट मध्ये आयोजित बैठकीमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर यांनी तर  संचालन प्रा.अनिल बळी तर आभार प्रदर्शन समाधान गि-हे यांनी केले आहे.

     कार्यक्रमास प्रामुख्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे, संजीव नागुलकर, शिवाजी वानखेडे, किसन साळसुंदर, पांडुरंग, संगीता काकडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. चहा पाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post