प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : व्हाट्सअप स्टेटस वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी दोन जणांना अटक केल्याची घटना आज दिनांक 8 जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली. सोहेल खान अजीस खान वय 21 व जावेद खान आयुब खान वय 26 दोन्ही रा. चीचबाभर ता रिसोड अी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी माहिती अशी की सदर दोन्ही युवकांनी आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले स्टेटस लावणे असल्याची माहिती पोलिसांना मिळतात ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी तात्काळ आज सकाळी सात वाजता च्या दरम्यान चिंचांभर गाठून सदर दोन्ही आरोपींना अटक केली व कलम 153
नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय अजमीरे करीत आहेत.
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. हल्ली समाजकंटक सोशल मिडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक झाले आहे.
अश्याप्रकरणी कलम १५३(अ), २९५(अ) भादंवि अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाते. या वर्षी सोशल मिडियाचा दुरूपयोग करून आक्षेपार्ह पोस्ट/लेख प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांविरोधात कलम १५३ (अ) व २९५(अ) भादंवि अन्वये ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकूण १५ आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल तसेच पोलीस स्टेशन लक्ष ठेवून आहे.
_‘नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या हितासाठी सामाजिक एकोपा, बंधुभाव कायम राहावा यासाठी करावा. सोशल मिडीयाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत असून अश्यांविरोधात 11 गुन्हे दाखल करून 15 आरोपींना अटक करण्यात आली असून यापुढे देखील अश्याप्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत. नागरिकांनी त्यांना आलेल्या भडकाऊ संदेशावर/अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे अफवा पसरविणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’_ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस केले आहे.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय,
वाशिम