शिरूर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

 


प्रतिनिधी -अर्जुन शेळके


शिरूर -पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली असून घटनास्थळी शिक्रापूर पोलीस तातडीने दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक मृतदेह जळत असल्याचे निदर्शनास आले मात्र मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने सदर मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याबाबत काही माहिती समजू शकली नसून घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, तर शिक्रापूर पोलिसांचे शोध कार्य व तपास सुरू झाला आहे.


या घटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षकनितीन अतकरे, जमादार चौधर, पोलीस नाईक विकास पाटील, शिपाई रावडे व शिवणकर इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post