प्रतिनिधी अर्जुन शेळके
पिंपरी दुमाला येथे सोमेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे मंदिरावर वेगवेगळे अशय असणारे तब्बल शंभर शिल्पे कोरण्यात आली आहे यामध्ये शिव विष्णू चामुंडा गणेश नाथ योगी सुरसुंदरी यांच्या शिल्पाचा समावेश होतो मंदिराच्या शिल्पांमध्ये नवनाथांच्या मूर्ती आढळतात पिंपरी दुमाला येथील हे शिल्प वैभव पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरून वर्षभर पुरातत्त्व विभागाचे अनेक मान्यवर भाविक भक्त पर्यटक भेट देत असतात मंदिरा शेजारी मजबूत बांधणीची पुष्करणी बांधलेली दिसून येते पिंपरी दुमाला गावाचे नाव आता
विदेशातही पोहोचले आहे सोमेश्वर मंदिर हे कलास्थापत्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे दिसून आले आहे मंदिराचे संगोपन व संवर्धन व्हावे अशी इच्छा नाथ संप्रदायाचे गाडे अभ्यासक डॉक्टर विजय सरडे यांनी इच्छा व्यक्त केली याप्रसंगी पुणे येथील माजी लेणी अभ्यासक डॉक्टर श्रीकांत जाधव हे देखील उपस्थित होते यावेळेस आलेल्या मान्यवरांचा सन्मान ग्रामस्थांतर्फे मा आदर्श सरपंच गायत्री चिखले देवस्थान ट्रस्ट बांधकाम समितीचे अध्यक्ष सर्जेराव चिखले मा उपसरपंच अशोक दुर्गे मा संचालक दादाभाऊ शेळके सोमेश्वर जीर्णोद्धार समिती संचालक शेखर पाटेकर अदी ग्रामस्थ उपस्थित होते

