रिसोड एसटी बस मध्ये वाढत आहेत वाद-विवाद बसेस वाढण्याची प्रवाशांची मागणी, चालक वाहकांना त्रास




शेख अन्सार प्रतिनिधी


रिसोड : एसटी महामंडळ वाहनाना पूर्वीच नादुरुस्ती चे ग्रहण लागलेले आहे.यातच वारंवार मागण्या करूनही बसेस वाढता वाढेना यामुळे मात्र एकीकडे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून चालक व वाहकांनाही रोज रोज नवीन नवीन विषयांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे वाहक व चालकांना ड्युटी करावी तरी कशी ? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. 


राज्य सरकारने महिलांना प्रवासात 50 टक्के सूट दिल्यानंतर एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओघ वाढलेला आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होत आहे. मात्र एसटी बसेस मध्ये प्रवाशांची तुंबळ गर्दी होत आहे यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे तर चालक वाहकांना मात्र विविध प्रकरणांना सामोरे जावे लागत आहे.असलाच एक प्रकार आज दिनांक 23 जून रोजी संध्याकाळी 6 वा पहावयास मिळाला. अकोला जिंतूर बस मध्ये 100 च्या वर प्रवासी होते. त्यामुळे या बस मध्ये खचाखच गर्दी होती चालक बस चालवत होता यादरम्यान शिरपूर ते रिसोड दरम्यान बस चालकाने बस चालवत असताना हलकासा ब्रेक लावला यात एक महिला ही खाली पडली असल्याचे त्या महिलेने सांगितले तर आपणास मार लागल्या असल्याचेही सदर महिलेचे म्हणणे होते. मात्र अन्य प्रवाशांकडून मिळालेले माहितीनुसार असे काहीही झाले नाही मात्र सदर महिलेने आपणास ब्रेक मारला मुळेच मार लागला असल्याचे सांगितले. सदर बस रिसोड बस स्टैंड वर जेव्हा आली तेव्हा महिलेने पुन्हा सदर बाब वाहकास सांगितली बसचे वाहक व चालकाने त्या महिलेस येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास नेले. प्रवाशांची वाहनांमध्ये तुंबळ गर्दी बघता बस फेऱ्या वाढवण्याची गरज आहे मात्र याकडे शासन प्रशासन लक्ष देत नसल्याचे कित्येक दिवसापासून निदर्शनात येत आहे. बस मध्ये जागेवरून वाद, चोऱ्या, हाणामारी असल्या बाबी लक्षात असूनही शासन याकडे लक्ष देत नाही. आज झालेला असला प्रकार मात्र चालकाची चूक नसतानाही विनाकारणच आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागला. मात्र तब्बल एक तास एसटी बस ही रिसोड बस स्थानकावर थांबली असल्याने त्यात बसलेल्या प्रवाशांना मात्र ताडकत बसावे लागले तर या दरम्यान बसमधील महिला लहान बालके व वृद्ध प्रवाशांना गर्मी चा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन वाहनांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post