दुधाच्या दराबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार : राधाकृष्ण विखे पाटील




अहमदनगर अफसर शेख


महाविकास आघाडीच्या काळात दुधाचे दर चांगलेच घसरले हाेते. आमच्या सरकारच्या काळात ३९ रुपयांपर्यंत दर गेले होते. सध्या दुधाचे दर कमी होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. दुधाच्या दराबाबत सरकार लवकरच याेग्य ताे निर्णय घेईल, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 बारामतीत पालखी सोहळ्याच्या तयारीच्या निमित्ताने त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधले.

*यावेळी ते म्हणाले*

''दुधाच्या प्रश्नावर लवकरच राज्यातील सर्व सहकारी व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावणार आहे. अमूल सारखी संस्था आज चाळीस रुपये लीटर दुधाला भाव देते. मग सहकारी संस्था असा दर का देऊ शकत नाही, वाढलेल्या खर्चाचा सर्व भार उत्पादकांनी उचलायचा हे योग्य नाही. याबाबत आता काहीतरी निर्णय करावा लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post