अन्यथा तुमच्या वाहनांना समृद्धी महामार्गावर नाे एन्ट्री




अहमदनगर अफसर शेख


राज्यातील एक सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असणारा समृद्धी महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला असला, तरी यापुढे या मार्गावर कोणती वाहने प्रवास करणार, यासाठी काही नियम लागू केले आहेत. या महामार्गावर जे वाहन प्रवास करणार त्याची संपर्ण तपासणी करण्यासाठी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. वाहन सुस्थितीत असेल, तरच महामार्गावर प्रवेश दिला जाणार आहे. 

 *परिवहन आयुक्तांच्या हस्ते उदघाटन*

हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागातर्फे शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता परिवहन आयुक्तांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post