रांजणगाव प्रतिनिधी अर्जुन शेळके
रांजणगाव - भारत एकता मिशन भिम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष मा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर आज दुपारी झालेल्या भ्याड गोळीबाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य भिम आर्मी प्रदेशाध्यक्ष मा. सिताराम भाऊ गंगावणे जिल्हा अध्यक्ष मा.संदिपभाऊ शेलार पारनेर तालुका अध्यक्ष संजू भाई सोनवणे शिरूर तालुका महिला अध्यक्ष सुनीताताई सोनकांबळे कारेगाव अध्यक्ष साक्षी ताई यांनी आज संध्याकाळी ०७ :३० वा.पुणे नगर हायवे यश ईन चौक कारेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करून गोळीबार करणाराला लवकरात लवकर पकडले जावे, अन्यथा भीम आर्मी तर्फे देशभर सुरक्षेच्या कारणास्तव कायदा हातात घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन पोलिस बंदोबस्तात आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. येणारा काळ हा भयंकर परिस्थिती निर्माण करणारा असुन सरकार कडुन सामाजिक सुरक्षिततेचा भंग करत नागरी सुरक्षेचे उल्लंघन सहन करणार नसल्याचे भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष सीताराम भाऊ गंगावणे यांनी सांगितले असुन भीम आर्मी सहित सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाने संरक्षणासाठी कटिबध्द राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी सर्व संघटनेतील पदाधिकारी यांनी जागरूक राहण्याचे आवाहन संदिप भाऊ शेलार यांनी केले.
