महिलांना छेडणाऱ्यांची आता खैर नाही; महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली, काय आहे पोलिसांचा प्लॅन?



महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे.त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.

  पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार (Crime Branch, Traffic Branch, and local police.) महिलांची, विशेषतः आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहीम सुरु केली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग असेल.

Post a Comment

Previous Post Next Post