रांजणगाव गणपती येथे आठवडी बाजारामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट




रांजणगाव गणपती येथे आठवडी बाजारामध्ये दोन महिलांनी एक लहान  मुलाच्या गळ्यातील सोन्याचा अलंकार चोरण्याचा प्रयत्न केला


रांजणगाव गणपती- शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे बुधवारच्या आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो त्या बाजारामध्ये कंपनी कामगार मोठ्या संख्येने बाजार करण्यासाठी येत असतात दिनांक 21/06/2023 रोजी  सायंकाळी 5:30 सुमारास एका महिलेच्या  लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचा अलंकार चोरण्याचा प्रयत्न केला ते लगेच लक्षात येताच त्या चोरी करणाऱ्या महिलेला पकडले  त्यानंतर रांजणगाव पोलीस स्टेशन क्रमांक वरती फोन लावला असता फोन कोणी उचलला नाही असा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेच्या वेळी रांजणगाव महागणपतीच्या प्रवेशद्वार शेजारी असणाऱ्या उभ्या असणाऱ्या ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी ट्राफिक पोलीस अधिकारी हजर होते त्या   अधिकाऱ्याला मदत मागितली असता अधिकाऱ्यांची उत्तरे असे आले की ते काम माझे नाही आम्ही ट्रॅफिक कंट्रोल आहे असे सांगितले  पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

Previous Post Next Post