प्रतिनिधी सचिन घावट
ठाणे :- ठाणे शहरात अनेक ठिकाणी उंच उंच होर्डिंग लावण्यात आलेले आहेत या उंच होर्डिंग वर जाहिरात लावताना कामगार सुरक्षा बेल्ट, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, इत्यादी सुरक्षा विषयक साधने वापरताना दिसत नाहीत . त्यामुळे जाहिरात कंपन्यांचे मालक यांना कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम,संबंधित सुरक्षा उपकरणे व त्यांचा वापर यांची माहिती नसल्याने अथवा त्याबद्दल अनास्था असल्याने कामगारांचे व नागरिकांचे जीव आणि एकूणच परिस्थिती धोक्यात येत आहे. त्यामुळे उंचावर काम करताना पडून एखादा अपघात अथवा जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
उंचावर काम करणाऱ्या कामगाराचा अपघात विमा काढलेला असणे,काम करतेवेळी सुरक्षा नियमांचे पालन,सुरक्षा उपकरणांचा वापर व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जाहिरात कंपनीचा प्रतिनिधी हजर असणे प्रशासनाने सक्तीचे केले पाहिजे.
ठाणे शहरात होर्डिंग पडून अपघात होऊन जीवितहानी झाल्यास होर्डिंग कंपन्यांच्या मालकांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दखल करावेत अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या आहेत त्याबरोबरच सुरक्षा उपाययोजना शिवाय काम करणाऱ्या होर्डिंग कंपन्यांनवर देखील प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
जाहिरात फलक,कामगारांची सुरक्षा याबाबत पालिकेने आखून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता न करता जाहिरात कंपन्या जर काम करत असतील तर प्रशासनाने केवळ कारवाई ची घोषणा न करता कठोर कारवाई करावी एखादा अपघात अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहू नये.
ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आज ईमेलद्वारे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे हि मागणी केली आहे.
