नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावणे धोक्याचे शिवशाही बसेसमध्ये अधिक त्रुटी





रिसोड : राज्य महामंडळाच्या बसेस नादुरुस्त होउन रस्त्यावर बंद पडणे ही नित्याची बाब झाली आहे.परंतु सदोष बस असूनही रस्त्यावर धावणे किती धोक्याचे आहे याचा अंदाज लावणे शक्य नाही.रिसोड आगारातील बसेस विशेषत: शिवशाही. बसमध्ये दोश आढळतात.

एक तर प्रवाशांच्या तुलनेत रिसोड आकाराला बसेसची संख्या खूपच कमी आहे.वारंवार मागणी करूनही शासन नवीन बसेस उपलब्ध करून देत नाही.बहुतेक बसेस जुन्या असून त्यात विविध प्रकारचे दोष आढळून येतात. नादुरुस्त बसेसचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.परंतु दोष असूनही बसेस रस्त्यावर येणे आश्चर्यकारक आहे.तांत्रिक अडचण,बसमध्ये बिघाड असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, बसेस रस्त्यावर टाकल्या जातात, जे धोक्याचे असते.परंतु रस्त्यावर काही विपरित घटना घडली तर सर्व दोष चालकावर टाकला जातो.अशा परिस्थितीत चालक जबाबदार नसतो.असे असूनही त्याला दोषी धरले जाते. अशा परिस्थितीत शासन व प्रशासनाने बसेस पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतरच रस्त्यावर उतरवाव्यात.अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.



रिसोड बस डेपोत शिवशाही बसची संख्या 4 आहे. मात्र या चारही बसेसच्या रेडिएटरमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. रेडिएटर बसचा वेग नियंत्रित करतो.बसचे जास्त वजन आणि रेडिएटर सदोष असल्याने शिवशाही बसचे ब्रेक नियंत्रित करणे कठीण होते. अशा स्थितीत वाहनचालकांच्या अडचणी वाढून विपरित घटनेचा धोका वाढतो.




 शिवशाही बसेसमधील अशा दोषांबरोबरच काही बसेस च्या ऐसी बंद असल्याची माहितीही समोर आली आहे. शिवशाही बसचे भाडे सामान्य बसच्या तुलनेत जास्त आहे. शिवशाही बस मध्ये आरामदायी प्रवास आणि एसीमुळे प्रवासीही जास्त भाडे मोजतात. मात्र एसी बंद पडल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत याकडे अधिक लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post