रिसोड येथे विद्युत तारा मुळे वाहतूक कोंडी



प्रतिनिधी अन्सार शेख

 रिसोड : शहरातील वाशिम नाका ते मालेगाव नाका या रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे, रस्त्याच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.विद्युत खांब, डीपी, व त्यावरून जाणाऱ्या तारांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.विविध प्रकारच्या तांत्रिक अडथळ्यांमध्ये अडकलेला रस्ता डोकेदुखी ठरत आहे.रिसोड शहरातील हा सर्वात महत्वाचा रस्ता आहे. महावितरणचे सुरू असलेले काम, खांब व डीपी हलविण्याचे काम सुरू असले तरी ते अत्यंत संथ गतीने सुरू असून, खांब रस्त्यावर  असल्याने मोठे वाहन आले कि, वाहने बराच वेळ उभी राहतात व लांबच लांब रांगा लागतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यात असलेले खांब हटविण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post