पत्नी विषयी अपशब्द वापरले म्हणून केला खून, दोघे जण गजाआड




अहमदनगर अफसर शेख


 श्रीरामपूर येथे पत्नीविषयी अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले. सुनील सीताराम देवकर (वय 22, रा. महादेवनगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर) व एक अल्पवयीन बालकाचा जेरबंद आरोपींमध्ये समावेश आहे.

 रेल्वे स्टेशन परिसरात जेरबंद

श्रीरामपूर येथे तन्वीर शहा याने सुनील देवकर यांच्या पत्नीविषयी अपशब्द वापरले. याचा राग धरून सुनील देवकरने तन्वीर शहाचा धारदार शस्त्राच्या सहाय्याने खून केला. या संदर्भात तन्वीरचा भाऊ साजीद छोटू शहा याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना जेरबंद केले. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Post a Comment

Previous Post Next Post