एकता नगर मध्ये बुद्ध विहारा साठी प्रा.विजयराव तुरुकमाने यांचा पुढाकारआमदार झनक अवश्यक निधी देणार.

  .


 


प्रतिनिधी-अन्सार शेख

रिसोड :-स्थानिक एकता नगर मधील खुल्या जागेत दर्जेदार बुध्द्धविहार व्हावे यासाठी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रा.विजयराव तुरुकमाने यांनी पुढाकार  घेतला आहे.यासंदर्भात आमदार अमित झनक व एकता नगरमधील गणमान्य रहिवाश्यांची प्रा विजयराव तुरुकमाने यांच्या निवासस्थानी सोमवार 5जुन ला महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.बैठकीत आमदार यांनी बुद्द्धविहारासाठी अवश्यक निधी पुरविण्याचे आश्वासन दिले.वाशीम जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट विहार रिसॊडमध्ये झाल पाहिजे अशी तयारी सर्वांनी करावी त्यासंबाधित अवश्यक कागदपत्र व डिजाईन तयार करण्यास मदत करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.तात्काळ बुध्द्धविहार निर्माण समिती गठीत करण्यात आली व त्यामध्ये समाजिक स्तरावर काम करणार्यां समाज बांधवांना सामावून घेण्यात आले.यापुढे या समितीच्या माध्यमातून विहार निर्मितीचा मार्ग सहज होईल.आमदार झनक यांनी निधी देण्यासाठी दाखविले तयारी यामुळे सर्वांच्या वतीने माजी नगराध्यक्ष प्रा.विजयराव तुरूकमाने यांनी त्यांचे आभार मानले.व सर्व समाज बांधवानी भविष्यातही सहकार्य  करावे असा अपेक्षा व्यक्त केल्या.सभेला एकतानगर सह् शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post