अतीदुष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी .सामाजिक कार्यकर्ते गजानन केळे यांची मागणी पेरणी सुरू होण्या अगोदर नुकसान भरपाई दयावी






मुंगळा: वार्ताहर ः


 यावर्षी वेळी अवेळी झालेल्या  पावसाने मुंगळा परिसरातील शेतकऱ्यांचे खरोखरच हाता तोडसी आलेले पिके अक्षरशः हिरावून घेतला असुन  सोयाबीन मुग उडीद  हगाम सुरू होताच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे  नुकसान झाले असून मुंगळा मंडळातील शेतकऱ्यांचे शेतात येऊन नुकसानीचे पंचनामे केले तरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत देण्यात आले नाही तरी शासनाने

 शेतकऱ्यांना  त्वरित  नुकसान भरपाई द्यावी  आसी सामाजिक कार्यकर्ते   उपसरपंच गजानन केळे यांनी केली आहे .  चालु हंगामातील अतीदुष्टीमुळे खरोखरच सोयाबीन मुग उडीद पीकाचे आतोनात नुकसान झाले होते. मालेगाव तालुक्यातील सर्व मंडळांना नुकसान भरपाई मिळाली मात्र यातून मुंगळा मंडळ अद्याप पर्यंतही नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेतच आहे  मुगळा मंडळातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व पिकाचे पंचनामे झाले  तसेच मुंगळा येथील अतिअल्प भुधारक शेतकरी सुनीता कुटे याचेही स्वखर्चाने केलेले शेडनेट व तमाटे पिक वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी मुळे शेडनेट व मालासह नासधुस होऊन जवळपास २लाखाचे नुकसान झाले असून  . तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार याना नैसर्गिक आपत्ती मध्ये समाविष्ट करण्या करीता नुकसानीचे निवेदन देऊन आजपर्यंत नुकसान ग्रस्त महीला शेतकऱ्यांला मदत मिळाली नाही.  अतिदुष्टिमुळे फाजीपाला खराब होऊन सर्व जमीन पडीत पडल्याने अतिअल्प भुधारक  महीला शेतकरी यांचे नुकसान झाले   सततच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी   झाली व सोयाबीन डागी होऊन मातीमोल भावाने विकले गेले व  पेरणी  करीता सोयाबीन बीयाने ९ ते  १० हजार घेतल्या जात आहे . सरासरी शेतकऱ्यांचा कोणताही माल विक्रीला येताच बाजारात मातीमोल भावाने खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या घरचा माल होताच शेतकऱ्यांना मात्र तोच माल डंबल भावाने खरेदी करावा लागतो. आसा कसा शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायांना  वाचा फोडण्या करीता युवा सामाजिक कार्यकर्ते  उपसरपंच गजानन केळे यांनी कबंर कसली आहे. आज शेतकऱ्यांची होणारी अवस्था उघड्या डोळ्यांनी लोकप्रतिनिधी पाहुन मुक बधीराचे सोग घेत आहे. अशीच जर अवस्ता  ज्यास्त दिवस राहिली तर हे दिवस  शेतकऱ्यांच्या हितासाठी नाहीत आसे गजानन केळे यांनी म्हटलेआहे.  आधीच मृगनक्षत्र सपंत असुन पेरणी लाबनार म्हणून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आज जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मदत जमा झाली असती तर  शेतकऱ्यांना बॅका मध्ये  कर्जा करीता लाईनीत तासनतास ताटकळत बसावे लागले नसते. तसेच काही शेतकऱ्यांचे आतिदृष्टिमुळे मागील वर्षीचे कर्ज न भरू शकल्याने शेतकरी शावकाराच्या घरी चकरा मारून पेरणी करीता कर्ज घेत असल्याची चर्चा गावामध्ये होत आहे  .तसेच

सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच गजानन केळे

 अतिदुष्टिचीनुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून शेतकरी  कर्जबाजारी झाला आहे    . तरी  लवकरात लवकर मुंगळा मंडळातील  झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असी मुंगळा मंडळातील शेतकऱ्यां बरोबर युवा सामाजिक कार्यकर्ते  माजी उपसरपंच गजानन केळे यांनी केले आहे. त्वरित नुकसान भरपाई खात्यात जमा करावि असे गजानन केळे  यांनी  नागरीकामधुन मागनी  केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post