केनवड मध्ये विजेचा लपंडाव: नागरिक हैरान




  रिसोड :  केनवड मध्ये विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढ होत आहेत. महावितरण ला वाऱ्या पाण्याची एलर्जी आहे की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. कधी कधी थोडे ढगाळ आले, वारा आला 8 तास ते कधी 12 तास तर कधी रात्र भर लाईन नसते. केनवड मध्ये जास्तीत जास्त शेतकरी गोरगरीब वर्ग आहे त्यांच्याकडे इन्व्हर्टर ची सुविधा नसल्यामुळे त्यांना अंधारामध्ये झोपावे लागते लहान लेकरे आहेत म्हातारी माणसं आहेत कधी लाईट जाईल याचा भरोसा नाही ग्रामस्थांना प्रश्न पडला त्यात सूर्यदेव आग ओकतोय घरात बसविल्या जात नाही ही केनवड मध्ये गांभीर्यची याची बाब आहे.


केनवड परिसरात हवामान खराब होताच तसेच रिमझिम पाऊस सुरु होताच वीज पुरवठा बंद होतो. त्यामुळे नागरिकांच्या मौल्यवान विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे.वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही केनवड मध्ये नित्याची बाब झाली आहे. कडक उन आणि कडाक्याच्या उकाड्याने नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत. वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी कोणतेही वेळापत्रक नाही. कधीकधी वारा किंवा वादळ न होता दिवे बंद होतात. त्यामुळे संपूर्ण काम ठप्प होते. लाईट येताच पुन्हा कसेतरी कामाला गती दिली जाते परत अचानक लाईट जाते. वारंवार वीज खंडित होत आहेत.


वीज खंडित होणे समाजण्यापलीकडे झाले आहे. विजेच्या लपंडावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना आता रखरखीत वातावरणाचा सामना करावा लागत आहे. या उकाड्यामुळे सर्वांचीच अवस्था दयनीय झाली आहे. महावितरणकडून भारनियमन होत असताना त्याची माहिती सर्वसामान्यांना मोबाईलद्वारे दिली जाते. मात्र, कोणतीही माहिती नसताना दररोज वारंवार होत असलेल्या अघोषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी कधीही वीजपुरवठा खंडित होतो. अघोषित भारनियमनामुळे नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत. थोडा पाऊस सुरु होताच किंवा जोरदार वाऱ्यामुळे अचानक वीज जाते. एकुणच केनवड व परिसरातील नागरिकांचे यामुळे हाल होत आहे.या बाबत विचारणा केल्यास काहीही उद्ध्ट बोलून खोटी कारणे सांगून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरत आहे.तरी या गंभीर बाबीकडे वरिष्ठ लक्ष देतील काय असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे

Post a Comment

Previous Post Next Post