.
कामरगांव जवळील बाबापूर येथील घटणा .गळफास लाऊन संपविले जीवन .
धनज ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद .
कारंजा प्रतिनीधी / अशोकराव उपाध्ये
कामरगाव जवळील बाबापुर येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्याने आगामी खरीप हंगामात पेरणीच्या विवंचनेतून आत्महत्या केली . ही घटना धनज ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा तालुक्यातील कामरगावजवळील बाबापूर येथे 10 जून रोजी सकाळी उघडकीस आली . हरिष रामभाऊ ठाकरे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव असून ते बाबापूर येथील रहिवासी आहे .मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी त्यांच्या घराजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ही घटना उघड झाली . कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून धनज ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून शनिवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला . सूत्रांच्या माहितीनुसार रब्बी हंगामात कांदा पिकाचे झालेले नुकसान ;डोक्यावरील कर्जाचा डोंगर व खरीप हंगामातील पेरणीची विवंचना यातून त्यांनी आत्महत्या केली असावी . मृतक शेतकरी हरीश ठाकरे यांच्याकडे कामरगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 60 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती देखील समोर आली आहे .त्यांच्या मृत्यू पश्चात आई-वडीलi पत्नी व दोन मुले ; दोन भाऊ असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
