बाहेर पडताना बदल पाहूनच बाहेर पडण्याच्या सुचना, एक हजार पोलीस करणार वाहतुकीचे नियमन
पुणे दि १० (प्रतिनिधी)- आषाढी वारीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी येणार आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस बदललेले मार्ग पाहून प्रवास करावा लागणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १० जून रोजी देहू येथून प्रस्थान झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे ११ जून रोजीआळंदी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी १०० कर्मचारी राहणार तैनात करण्यात आले आहे.तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक
बदल
* बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने
चर्च चौक).
*चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).
*पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस
मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).
* मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).
*चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- जुना
मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील (बोपोडी चौकातून पुणे-
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील
रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून
