शिरूर तालुक्यात घटाचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी...




शिरूर (शंकर तिडके): शिरूर तालुक्यातीलआमदाबाद येथे घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी झाल्याची घटना घडलआहे. तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.आमदाबाद येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या बंद घटाचा दरवाजा उचकटून घरातील दोन तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन, दिड तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा नेकलेस, दोन तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा राणी हार, पावणे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे कानातील सोन्याचे झुमके वेल कर्णफुले, दिड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, एक तोळे वजनाचे चांदीच्या दागीण्यातील एक जोड जोडवे, पायातील दोन जोड पैजन व 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दिनांक 08 ते रात्री 11 ते दि. 09 रोजी 8 वाजण्याच्या दरम्याण आमदाबाद फाटा गवळी वस्ती येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या राहत्या घराचा आतील बंद दरवाजाची कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीतील सोन्या चांदीचे दागीणे व पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम असा अंदाजे एकुण साडेपाच लाख रुपयांचे दागीणे रोख रक्कमेसह घरफोडी करून चोरून नेले आहे. या घरफोडीबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post