विधान परिषदेचे विद्यमान आमदार सचिन जी आहेर यांच्याकडून पक्ष विस्तारासाठी युवा जिल्हा प्रमुख संदीप शिंदे यांना बळ देण्याचे काम



प्रतिनिधी- अर्जुन शेळके 


पुणे ८(प्रतिनिधी)-  गेल्या वर्षभरापासून उद्धव बाळासाहेब गटाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार सचिन जी आहेर हे आपला पक्षाचा विस्तार होण्यासाठी प्रयत्न करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवक अध्यक्ष संदीप भैया शिंदे यांना विशेष असे बळ देत असून श्री शिंदे यांच्या सोबत युवकांचे मोठे जाळे तयार झाले आहे याचा प्रत्येय आज महागणपती रांजणगाव गणपती येथे उपसरपंच पदाच्या निवडणुकी वेळी जिल्हा परिषद गटातील अनेक तरुणांनी जिल्हा युवक प्रमुख संदीप शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती युवक जिल्हा प्रमुख संदीप शिंदे हे रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील अनेक कामगारांचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवण्यात यशस्वी झालेले आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी स्वतः मेहनत घेऊन युवकांचे जाळे तयार केले आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन विधान परिषदेचे आमदार सचिन जी आहेर वारंवार त्यांचे कौतुक तर करत असतातच परंतु अडचण येईल तेथे ठामपणे उभे राहून बळ देण्याचे काम करत असतात आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये श्री शिंदे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यांचे वाढते वलय हे प्रस्थापित व विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते यात काही शंका नाही

Post a Comment

Previous Post Next Post