मालेगाव : उमेश लहाने
सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला वाशिम येथे दिनांक 3 जुलै ते 9 जुलै या दरम्यान जागतिक प्लास्टिक निर्मूलन सप्ताह निमित्त एक अभियान राबविण्यात आले.आणि सैनिक शाळेतील एनसीसी कॅडेट यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे आपले योगदान दिले. प्लास्टिक निर्मूलन अभियाना अंतर्गत पार्थ कावरे यांनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापराने होणारे दुष्परिणाम हे निसर्गावरच नाही तर पशु,पक्षी, प्राण्यावर व शेवटी मानवावर कशाप्रकारे होते हे विविध उदाहरणे, दाखले देऊन स्पष्ट केले. या कालावधीत विविध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कागदाच्या पिशव्या बनवून शाळेतील शिक्षकांना तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट दिल्या. शाळेचा परिसर स्वच्छ करून शाळेत भेटीस येणाऱ्या पालकांना प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कसे होतात याविषयी जनजागृती केली.तसेच शाळेमध्ये कार्यरत असणारे सि.टी.ओ.अक्षय खांदवे यांनी प्लास्टिक निर्मूलनावर आधारित विविध विषयावर चित्रकले स्पर्धेचे आयोजन केले हे अभियान राबवणाकरिता शाळेचे प्राचार्य एम. एस.भोयर व कमांडंड कर्नल पी.पी. ठाकरे तथा उपप्राचार्य एस.बी. चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.असे प्रसिद्धी विभाग प्रमुख रमेश आर. पडवाळ यांनी कळविले
