रांजणगाव गणपती येथे उपसरपंच पदाची निवडणूक उत्साहात संपन्न


 



 प्रतिनिधी-अर्जुन शेळके

पुणे दि 7(प्रतिनिधी)- रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायत मध्ये  उपसरपंच संपतराव खेडकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली हे प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली रांजणगाव गणपतीचे आदर्श व्यक्तिमत्व *भीमाजी आप्पा खेडकर मा सरपंच* व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान *संचालक आबासाहेब पाचुंदकर पाटील* यांच्या नेतृत्वामध्ये व विद्यमान सरपंच सर्जेराव खेडकर यांच्या पुढाकाराने श्री *आकाश  बत्ते यांची कुठलाही अर्ज न आल्यामुळे एक मुखाने उपसरपंच पदाची निवड करण्यात आली*  या निवडी वेळेस अनेक आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

    या निवडी वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा जिल्हाप्रमुख संदीप भैय्या शिंदे यांनी विशेष निमंत्रित केलेले विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ आहेर हे आवर्जून उपस्थित होते यावेळेस विद्यमान उपसरपंच आकाशराव बत्ते यांचा सचिन भाऊ आहेर व युवा सेना पदाधिकारी यांनी श्री आकाश बत्ते यांचा सन्मान केला व्यासपीठावरती अनेक मान्यवरांनी रांजणगावच्या विविध प्रश्नांविषयी सन्माननीय आमदार महोदय यांच्याजवळ समस्या मांडल्या यावेळेस सन्माननीय आमदार महोदय यांनी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलेल्या समस्यांचे निवारण करू अशी ग्वाही दिली

 यावेळेस या संपूर्ण कार्यक्रमाचे रूपरेषा प्रसिद्ध निवेदक सिने अभिनेते रोहिदासजी खेडकर यांनी मांडली

Post a Comment

Previous Post Next Post