मुंबई येथील महामोर्चात मालेगाव तालुक्यातील गायरान धारकांनी सहभागी व्हावे...



"वंचित बहुजन आघाडीचे मालेगाव तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार यांचे आवाहन"



वाशिम ; महाराष्ट्र राज्यातील गायरान धारकांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनात मुंबई विधानभवनवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली दि. २० जुलै रोजी भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून सदर मोर्चामध्ये मालेगांव तालुक्यातील संपूर्ण  गायरान धारकांनी आपल्या हक्काच्या लढाई साठी महामोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे मालेगांव तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार यांनी केले आहे.

        गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील गायरान धारकांचा प्रश्न प्रलंबित असून वंचित समूहाला प्रगती पासून दूर ठेवण्याचा सरकार डाव खेळत आहे.. अनेक वर्षांपासून मेहनत करून कसत असलेल्या आर्थिक दुर्बल  असलेल्याना गायरान जमिनीचा सातबारा द्या, बेघर अनु. जाती जमाती भटके विमुक्त यांना घरकुल योजनेचा लाभ देत मालकी हक्काची जागा द्या,  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत भूमिहीनांना जमिन देत त्यासाठी कृती कार्यक्रम शासनाने राबवावा, गायरानच्या प्रलंबित प्रकरणाचा सकारात्मक पद्धतीने भूमिका घेत दावेधारकांना जमिनी देण्यात यावा या प्रमुख मागणी साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवा नेते सुजातभाऊ आंबेडकर, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेशभाऊ विश्वकर्मा, अशोकजी सोनोने, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि. २० जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात मुंबई विधानभवनावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.. तेव्हा हक्काच्या लढाई मध्ये मालेगांव तालुक्यातील समस्त गायरानधारकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मालेगाव तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post