वाशिम प्रतिनिधी ; प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; छत्रपती युवराज स्वराज्य प्रमुख संभाजीराजे यांच्या आदेशाने, महाराष्ट्र संपर्कप्रमुख करण गायकर, महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, विदर्भ सचिव भुजंग काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत आज वाशिम जिल्हा स्वराज्य संघटनेची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह येथे घेण्यात आली, यामध्ये पुढील काळात स्वराज्य संघटनेच्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा व जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा स्वराज्य संकल्प अभियान या संदर्भात सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे हे वाशिम जिल्ह्याचा दौरा करणार असून त्या संदर्भातील सर्व गोष्टींची पूर्वतयारी करण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन स्वराज्य विदर्भ सचिव भुजंग जी काळे व विदर्भ प्रदेश निमंत्रक श्री. सदानंद आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संघटनेचे राज्य कमिटी सदस्य गोपाल भिसडे, उपस्थित होते.यावेळी वाशिम जिल्ह्यातील स्वराज्य निमंत्रक अरविंद पाटील,उद्धवराव ढेकळे, स्वप्निल वाघ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले, मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वराज्याचे आचार-विचार,भविष्यातील रणनीती,२०२४ च्या निवडणुकीत संदर्भात आपण सर्वांनी प्रत्येक गावोगावी जाऊन स्वराज्याच्या विचाराशी एकमत होणाऱ्या लोकांना जोडण्याचे काम हे येणाऱ्या काळात करायचे आहे, स्वराज्य संघटना ही तुमचं आमचं सगळ्यांचं भवितव्य घडविणारी एक मोठी चळवळ या राज्यात उभी राहिली पाहिजे,यासाठी आपण सर्वांनी तन-मन-धनाने विश्वासाने काम करायचे आहे, छत्रपती संभाजीराजेंचे विचार या महाराष्ट्राला प्रगल्भ करण्यासाठी व महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे,त्यामुळे आपण सर्वांनी स्वराज्याचा धागा होऊ प्रामाणिकपणे काम करायचे आहे.
तसेच स्वराज्य विदर्भ सचिव श्री. भुजंग काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज पर्यंत सर्व राजकीय पक्षांनी फक्त आपला वापर केला, त्यांच्या घराणेशाही चालवल्या बाप खासदार मुलगा आमदार नातू ज़िल्हा परिषद सदस्य या पद्धतीने या राज्यात या जिल्ह्यात हे सर्व राजकीय लोक काम करत असल्यामुळे विस्थापितांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना आमदार, खासदार,जिल्हा सदस्य,नगरसेवक,ग्रामपंचायत सरपंच बनविण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य या पक्षाची निर्मिती केली,असून त्यासाठी आपण सर्वांनी आज मेहनत घेतली तर निश्चितपणे उद्याचा येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी सोनेरी पानावर लिहिण्यासारखा असेल म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपण स्वराज्य संघटनेचे सभासद नोंदणी करून छत्रपतींच्या हात बळकट करायचे आहे.
हा बैठक यशस्वी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील
जिल्हा निमञंक स्वप्नील वाघ, उद्धवराव ढेकळे, अरविंद पाटील यांच्यासह शेकडो स्वराज्य चे मावळे यावेळी उपस्थित होते,,
