कोळगाव प्रतिनिधी-विजय शेंडगे
राज्य सरकारने शेतकरी सुजलम सुफलाम व्हावा यासाठी मातोश्री पांदण रस्त्याची योजना अमलात आणली परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन याच्या उदासतेनमुळे आज जिल्ह्यात एकही पांदन रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून झालेले नाही राज्य सरकारने या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयाची तरतूद केलेली असताना सुद्धा जिल्ह्यात एकही मातोश्री पांदन रस्त्याचे काम सुरू झालेले नाही शेतकऱ्याला शेतात जाण्या येण्यासाठी मुख्य म्हणजे रस्ता लागतो आणि जर रस्ता नसेल तर शेती करणे अशक्य असते आज शेतकऱ्याला शेतातील पेरणी करणे व शेतीची विविध काम
करण्यासाठी जाण्याकरता आज पांदन रस्त्यामधून त्यांची गाडी जात नाही त्यांना पैदल सुद्धा जाता येत नाही कारण की जवळपास टोंगळ्या इतका , चिखलातून जावे लागते त्यामुळे शेतकऱ्याची शेती करणे सुद्धा अवघड झालेले आहे आणि जर का पाऊस चालू असला तर शेतकऱ्याला शेतात जाणे अतिशय कठीण होते आणि या शेतकऱ्याच्या जीवनाकडे लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही आणि प्रशासनाकडे ही वेळ नाही आज शेतीचा एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना राज्य सरकार व त्यातील मंत्री हे या नात्याकारणाने त्यांच्या खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि एकमेकावर टीका करत आहेत परंतु आमचा शेतकरी राजा आज पावसाअभावी चिंतेत आहे आणि त्यातच शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीत मग शासनाला हे पांदन रस्ते करायचेच नव्हते तर या मातोश्री पांदण रस्त्याच्या योजनेचा एवढा कागवा गाजावाजा करण्याची काय गरज होती अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे

