जिजामाता विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक विविध शालेय मंत्रिमंडळाचे गठण




मालेगाव : उमेश लहाने 




पांगरी नवघरे येथे जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहिचे  महत्त्व व मतदान प्रक्रिया माहीत व्हावी, या उद्देशाने विद्यालयात वर्ग 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक घेण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख शिक्षक गणेश वाझुळकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राधेश्याम घुगे होते. तर, प्रमुख उपस्थितीतीत महाराष्ट्र पोलीस सचिन नवघरे,विशाल नवघरे होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून त्यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 प्राचार्य राधेश्याम घुगे यांनी लोकशाही, निडणुक प्रक्रिया, मतदान यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली . यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या मतदानातून वर्ग 10 वीचा  विद्यार्थि शुभम दिलीप नवघरे याची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. तर, उपप्रतिनिधी म्हणून अंजली विनोद टाले ची  निवड झाली. तसेच यावेळी आरोग्यमंत्री कार्तिक नवघरे, क्रीडामंत्री हर्षल सोमटकर, स्वच्छता मंत्री अभिषेक नवघरे, पाणीपुरवठा मंत्री,कृष्णा नवघरे, परिपाठ मंत्री पूनम आढाव ,पर्यावरण मंत्री वैष्णवी मैदकर ,वाढदिवस मंत्री स्वप्नील खंदारे, सांस्कृतिक मंत्री तुषार नवघरे, नियोजन मंत्री अर्जुन सुरुशे,अन्नपुरवठा मंत्री ओम नवघरे,विविध मंत्रीपदी विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली.या सर्व विद्यार्थ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून शिक्षक विलास खराटे, नवनाथ मुठाळ,प्रा.संतोष वाझुळकर,प्रा.गोकुळ राठोड,प्रा.पंकज इश्वरे, गणेश बाजड, वैशाली धंदरे, रवी जंजाळकर, शिक्षकेत्तर अनंत जहागीरदार, संदीप देशमुख, बळीराम नवघरे,मोहन शिरसाट, नितेश हजारे, तसेच वर्ग 5 ते 10 वीच्या विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर मानवतकर  यांनी केले. तर, प्रस्ताविक उमेश लहाने यांनी केले व आभार प्रदर्शन गणेश वाझुळकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post