NCP : जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून केलं मुक्त

 


मुंबई,दि.3: NCP: जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली.काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? | NCPअजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणासंदर्भात सूचना करायची होती. आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होतं त्यानंतर पक्षाच्या वर्किंगमध्ये उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो. तेव्हा मी काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, यात जयंत पाटील यांची नियुक्ती केली होती. तात्काळ व्यवस्था असावी त्यासाठी त्यांना जबाबदारी दिली होती, त्यापार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना कळवलं आहे त्यांना मुक्त करतोय. सुनिल तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करतो, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

काय म्हणाले अजित पवार 


रविवारी सुनिल तटकरेंची नेमणूक केली, त्यात काही निर्णय घेतले आहेत ते सांगितलेच. एकाला प्रतोद आणि विरोधी पक्षनेते नेमलेलं आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचं असतं. ज्याची संख्या जास्त असते त्याची नेमणूक करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी त्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार म्हणाले.


तटकरे यांनी आत्ताच पद स्विकारत कामाला लागावं. हँडओव्हरची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे. प्रदेशअध्यक्ष नात्याने बाकी नियुक्त्याच्या अधिकार सुनिल तटकरे करु शकतील. पक्षाच्या धोरणाधिकारे आम्ही हे ठरवलं आहे. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे काही गोष्टी कारवाई केल्या आहेत. माझंम्हणणं एक आहे, कुठल्याही व्यक्तीची बडतर्फीची प्रक्रिया स्पीकरकडे असते. त्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे गेल्यावर काही होऊ शकणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितलेय.


अजित पवार यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिल पाटील कायम राहतील. पक्षाकडून कुणाचीही हकालपट्टी होऊ शकत नाही


अजित पवार यांना आमदारांनी विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केलं आहे. अधिकृतपणे ते विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची जबाबदारी सांभाळतील. आम्ही प्रतोद म्हणून अनिल पाटील यांना जबाबदारी कायम ठेवली आहे. तसं मी विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. आम्ही सर्व अधिकृतपणे सर्व पार पाडलं आहे. विधानसभा सत्र होणार आहे, अशात ह्या नियुक्त्या केल्या आहेत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post