रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने ता 18/10/2023 रोजी रांजणगाव ता शिरुर जि पुणे येथे राजेश पेट्रोल पंपा समोर ईराम नामे 1) संकेत संतोष महागुनी रा शिरुर ता शिरुर जि पुणे 2) प्रथमेश संतोष नवले य कारेगाव ता शिरुर जि पुणे हे दोन तरुण उभे असल्याची माहीती मा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाल्याने त्यांनी तपास पथकातील पोराई शिवाजी मुंढे, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो काँ विजय शिंदे, पो हवा संतोष औटी यांना सदरची माहीती सागुन कार्यवाही करणे बाबत सुचना दिल्या त्यानुसार तपास पथकाने सापळा लावुन त्यांना ताब्यात घेउन त्यांची अंगझडती घेतली असता संकेत महामुनी याचे कमरेस एक गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे खिशात दोन जिवंत काडतुसे मिळुन आली त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांचा मित्र सुयश कोल्हे रा मोटेवाडी निमोणे ता शिरुर जि पुणे हा राहत असलेल्या कारेगाव ता शिरुर जि पुणे येथिल रुमवर तिन सिनेस्टाईल कोयते ठेवले असल्याची माहीती समोर आल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी जाउन तिन सिनेस्टाईल कोयते जप्त केले सुयश कोल्हे हा फरार असुन वरिल दोन्ही तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे सध्या त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर आरोपी कडुन खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला
1) 35000/- एक देशी गावठी कट्टा 2)2,000/- दोन पितळी धातुचे जिवंत काडतुसे 3) 500/- एक 34 इंच लांबीचा पालघन कोयता 4)500/- एक 30 इंच लांबीचा पालघन कोयता
5) 500/- एक 25 इंच लांबीचा पालघन कोयता
38,500/-
सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री मितेश गट्टे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत गवारी सो यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण, पोसई शिवाजी मुंढे सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो काँ विजय शिंदे, पो हवा संतोष औटी, वैजनाथ नागरगोजे, पो हवा विलास आंबेकर, अमित चव्हाण, पो काँ हेमंत ईनामे, पो काँ प्रतिक खरबस होमगार्ड शिंगाडे यांनी केली आहे सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास पोसई शिवाजी मुंढे हे करत आहेत
