प्रतिनिधी अर्जुन शेळके
शिरूर, पुणे : - शिरूर आंबेगाव चे विकासपुरुष व राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परीसरात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज करण्यात आला. कवठे येमाई फत्तेश्वर बंधाऱ्या नजीक घोड नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा पूल, धुमाळ वस्ती- पिराचा माळ- पाबळ रस्ता ३ कोटी ९५ लाख, कवठे -लाखणगाव रस्ता ४ कोटी ८२ लाख रुपये, कवठे येमाई कांदळकर वस्ती, सविंदणे शिव के टी बंधारा, मुस्लिम कबरस्थान संरक्षण भिंत अशा मंजूर विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ आज वळसे पाटील यांच्याउपस्थितीत करण्यात आला.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील, प्रकाशबाप्पू पवार, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, सोपानराव भाकरे, डॉ. सुभाष पोकळे, शिरूर तालुक्यातील विविध गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांचे सहकारी, सरपंच सुनीता पोकळे, सुदाम इचके, राजेश सांडभोर, विलासराव रोहिले, दीपक रत्नपारखी, दत्ता घोडे, मिठूलाल बाफना, दिनेशदादू काळे, बाजीराव उघडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवाक्रांती संघटने अंतर्गत पोलीस मित्र, माहिती अधिकार, पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांचा कवठे ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रामभाऊ इचके यांनी केले.त्यांचे सहकारी,सरपंच सुनीता पोकळे, सुदाम इचके,राजेश सांडभोर, विलासराव रोहिले, दीपक रत्नपारखी, दत्ता घोडे, मिठूलाल बाफना, दिनेशदादू काळे, बाजीराव उघडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी युवाक्रांती संघटने अंतर्गत पोलीस मित्र,माहिती अधिकार, पत्रकार व ग्राहक संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांचा कवठे ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रामभाऊ इचके यांनी केले.
